राणे अन् त्यांची दोन मुलं महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय

अहिल्यानगर : राणे आणि त्यांची दोन वाचाळवीर मुलं हे महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही अशी टीका उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष किरण काळे यांनी केले.


शिर्डी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेव खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना किरण काळे म्हणाले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहेत. तुमच्या हुकूमशाही सरकारने खासदार राऊत यांना तब्बल शंभर दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात डांबण्याचा पाप केले. 

त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून बनावट कारवाई करून छळ केला. मात्र मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर करताना त्यांची अटक "बेकायदा" आणि "विनाकारण" असल्याच स्पष्ट केल आहे. 

एवढ होऊन देखील राऊत यांनी सरकारच्या दडपशाही समोर गुडघे टेकून पक्ष सोडण्याची गद्दारी केली नाही. राणे यांची ठाकरे, राऊत यांच्यावर टीका करण्याची औकात नाही, असे काळे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post