विखेंनी मातोश्रीशी गद्दारी केली.

अहिल्यानगर : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्यांदा शिवसेनेने आमदार केले. पहिल्याच टर्मला त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये स्व. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपदाची संधी दिली. 


त्यांच्या कुटुंबात केंद्रीय उद्योग, अर्थराज्यमंत्री पद देखील दिले. आभाळा एवढे उपकार करून देखील विखे पाटलांनी मात्र ठाकरेंचे मीठ खाऊन मातोश्रीशी गद्दारी केली, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. 

मंत्री विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर शहर शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे. काळे म्हणाले, विखे पाटलांनी शिवसेनेच्या अस्तित्वाची चिंता करू नये. तुमच्या सारख्यांना पहिल्यांदा मंत्रिपद देऊन शिवसेनेने तुम्हाला राज्यभर अस्तित्व निर्माण करून दिले. 

ज्यांच्यामुळे तुमच अस्तित्व निर्माण झाले. त्यांच्या अस्तित्वावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यापेक्षा तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या. पालकमंत्री पद हे केवळ राजकीय कुरघोड्या करण्या करिता वापरण्या ऐवजी विकास कामांकरिता वापरा, असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post