अहिल्यानगर : कर्जत-जामखेडमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मतदारसंघातील निधी सरकारकडे अडकला आहे, यासाठी राम शिंदे कोणताही प्रयत्न करीत नाहीत, अशी टीका पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर केली.
मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्या ताब्यातील कर्जत नगरपंचायतीची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. तेव्हापासून राम शिंदेंवर रोहित पवार टीका करीत आहेत.
रोहित पवार म्हणाले, राज्य पातळीवर दबावतंत्र वापरून पक्ष फोडले, त्याचप्रमाणे कर्जतमध्ये केले. या सरकारच्या काळात लोकशाहीला किंमत राहिली नाही. पदाचा वापर लोकहिताऐवजी राजकीय ताबा आणि इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केला जात आहे.
Post a Comment