प्रेमात अडथळा ठरणार्या पतीलाच पत्नीने संपविले

मुंबई : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुंबईच्या ॲण्टाॅप हिल परिसरातील बंगाली पुरा, राजीव गांधी झोपडपट्टी येथे ही घटना घडली आहे. या हल्यात इस्माइल अली शेख याचा मृत्यू झाला आहे. 


या प्रकरणी प्रियकर सकलाईन गोलम किब्रिया शेख याला पोलिसांनी  अटक केली आहे. तर पत्नी सुमय्या ईस्माइल शेख ही सध्या फरार आहे. प्रियकर सकलाईन आणि सुमय्या या दोघांमध्ये लग्नापूर्वीपासून प्रेमसंबध होते. मात्र, सुमय्याचा विवाह हा इस्माइलसोबत लावून दिला, मात्र दोघांमध्ये तिच्या लग्नानंतरही  प्रेमप्रकरण सुरू होते. 

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या इस्माइलचा काटा काढण्याचा कट दोघांनी रचला. यातून सोमवारी सकलाईन याने चाकूने इस्मालवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.

आरोपींचे लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सुमय्याच्या कुटुंबाने तिचं लग्न इस्माइल अली शेख याच्यासोबत लावून दिलं. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध तसेच होते. याउलट त्यांच्या नात्यात अडथळा ठरणाऱ्या सुमय्याच्या नवऱ्याला त्यांनी बाजूला करण्यासाठी योजना आखली. 

सोमवारी सकलाईन याने चाकूने इस्मालवर वार करून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी ॲण्टाॅप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post