अल्पवयीन मुलीवर अत्याचार....

पुणे :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली. 16 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी तरुणाच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


फिर्यादी मुलीचा व आरोपीचा परिचय समाजमाध्यमाद्वारे झाला होता. त्यानंतर ओळख वाढवून आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. 

मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिला असता देखील त्याने मुलीला मारहाण करून संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post