वैष्णवी हगवणे प्रकरणात आणखी पाचजण पोलिसांच्या ताब्यात....

पुणे : पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे, आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिचा पती, सासू आणि नंदण यांना लगेचच अटक केली होती. मात्र तिचा दीर व सासरा राजेंद्र हगवणे हा फरार होता. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली. 

दरम्यान आता त्यांना मदत करणे पाच जणांना चांगलंच भोवले आहे, राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांचा समावेश आहे. 

त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  या पाचही जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post