कर्जत : आमदार रोहित पवार यांचे दुर्लक्ष आणि तत्कालीन नगराध्यक्षा गटाची एकाधिकारशाही यामुळे आम्हाला भाजपच्या वाटेवर जावे लागले असे राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी सुनील शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शेलार म्हणाले, राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असतानाही आमदार रोहित पवार यांनी तीन वर्षात एकही बैठक नगरसेवकांसोबत केली नाही.तसेच तात्कालीन नगराध्यक्ष यांच्या गटाची एकाधिकारशाही असल्याने आम्हाला निधी,काम करण्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हा निर्णय 11 नगरसेवकांनी एकमत करून घेतला आहे. यात राम शिंदे साहेब यांनी आम्हाला बोलावले नव्हते आम्ही होऊन त्यांच्याकडे गेलो. आगामी काळात कर्जत जर विकास करायचा असेल तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे नेतृत्वाखाली होऊ शकतो अशी आमची धारणा झाल्याने आम्ही स्वतः राम शिंदे साहेब यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेलार यांनी सांगितले.
तत्कालीन नगराध्यक्ष गटाकडून आमच्यावर शंभर गाळ्यांचे वाटपासाठी आम्ही पक्ष बदलला. जातीपातीचे राजकारण केलं असा कुठलाही प्रकार आम्ही केला नसून फक्त आणि फक्त कर्जत शहराच्या विकासासाठी आम्ही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळवली.
आम्ही सहलीला गेल्यानंतर अनेक नगरसेवकांना कोटीच्या कोटी ऑफर तत्कालीन नगराध्यक्षांच्या गटाकडून आले. आमच्यातला एकही नगरसेवक त्या प्रलोभनाला बळी पडला नाही. असे शेलार यांनी सांगितले. यावेळी लालासाहेब शेळके उपस्थित होते.
Post a Comment