अहिल्यानगर : पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, नैतिक मूल्यांचे होत असलेले अधपतन आणि कौटूंबिक विघटन यापासून देशाला वाचविण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या भारतीय मूल्य व्यवस्थेचा आधार हा एकात्म मानव दर्शनातून निश्चित उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पंडीत दीनदयाळ उपाध्य एकात्म हिरक महोत्सव जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एकात्म मानव दर्शन पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा कौशल्य व रोजगार मागदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख, एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीचे सदस्य रविंद्र मुळे, अभय आगरकर, दिलीप भालसिंग, दिनकर नितीन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे मंथन व्हावे, त्यांनी मांडलेला वैचारिक सिद्धांत नव्यापिढीला समजावा या उद्देशाने कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितची स्थापना करण्यात आली असून पंडित दिनदयाळ यांचे कार्य वेगवेगळया उपक्रमातून पुढे नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदनही केले.
अतिशय सामान्य परिस्थितीतून पंडितजींनी आयुष्याची सुरुवात करत साधेपणा, आत्मनिर्भरता आणि कठोर परिश्रमाचे बाळकडून त्यांना मिळाल्याने त्यांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाची जडणघडण त्याच दिशेने केली. बालपणातील संघार्षातून संवेदनशिलता आणि सेवाभास त्यांच्यामध्ये रूजला. विचारांच्या आधारावर त्यांनी केलेली कार्यसाधाना जाज्वल्य राष्ट्रभक्तीत त्यांनी रुपांतरित केली असल्याचेही पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उत्कृर्षाचा नवा इतिहास लिहिला जात आहे. यामागे पंडित दीनदयाळ यांच्या विचारांची प्रेरणा आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हा खऱ्या अर्थाने पंडितजींच्या अंत्योदय चळवळीचा मंत्र होता. देशाची सर्व क्षेत्रात होत असलेली प्रगती पहाता आणि विकासाच्या प्रक्रियेत समाजातील शेवटच्या व्यक्तीला वाढत्या सहभागाचे लक्षण हे खऱ्या अर्थाने अंत्योदयाच्या विचारांचे यश असल्याचेही ते म्हणाले.
भारत देशाला जगभरामध्ये श्रेष्ठस्थान प्राप्त होण्यासाठी मानवदर्शन पुस्तक सर्वांना भविष्याचा मार्ग दाखविण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करत या पुस्तकाच्या एक लक्ष प्रती जिल्हाभरात वितरित करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
Post a Comment