पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उध्दवस्त....

नवी दिल्ली :पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. भारतीय लष्कराने ९ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. 


या ऑपरेशनला लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही काळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आहे.

ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले जात होते.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले गेले नाही. भारताने लक्ष्य निवडण्याच्या आणि नष्ट करण्याच्या पद्धतीत खूप संयम दाखवला आहे. 

पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर ही पावले उचलण्यात आली आहेत.

हे दहशतवादी तळे उध्वस्त...

बहावलपूर - आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किमी अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होते, जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले.

मुरीदके - हे दहशतवादी ठिकाण बॉर्डरपासून ३० किमी अंतरावर होते, तिथे लश्कर ए तोयबाचे सेंटर होते, जे २६/११ मुंबई हल्ल्याशी जोडले होते. गुलपूर - हे दहशतवादी ठिकाणी LOC पासून ३५ किमी अंतरावर होते.

लष्कर कॅम्प सवाई पीओकेच्या तंगाधार सेक्टरच्या ३० किमीवर अंतरावर हे ठिकाण होते. बिलाल कॅम्प - जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड, हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे. कोटली- एलओसीपासून १५ किमी अंतरावरील लश्कर ए तोयबाचा कॅम्प, याठिकाणी ५० हून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते

बरनाला कॅम्प - LOC पासून १० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. सरजाल कॅम्प - सांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून ८ किमी अंतरावर जैशचं प्रशिक्षण केंद्र होते. मेहमूना कॅम्प - हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे प्रशिक्षण सेंटर होते, जे बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post