अहिल्यानगर ः अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही गावात दाणादण उडवून टाकली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मंत्रिमंडळातील मंत्री येतील अशी आशा शेतकर्यांना होती. शेतकर्यांची आशा फोल ठरली.
जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, नेवासे, श्रीगोंदा व नगर तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वनकुटे, वडगाव सावळाला, ढवळपुरी भागात गारांसह सुमारे एक तास पाऊस झाला.
या पावसामुळे आंबा, संत्रा, पपई या फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
चौंडी येथे मंत्रीमंडळाची बैठकीला संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. या बैठतीच्या पूर्वसंधेला शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी मंत्री करतील अशी शेतकर्यांना होती. परंतु एकही मंत्री नुकसानग्रस्त भागात फिरकले नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील गावात अवकाळी पावसाने हजेरी लावून पिकांचे नुकसानझालेले आहे. संबंधित आमदारांनी नुकसान भरपाईची पाहणी केली नाही.तसेच मंत्री महोदयांनी पाहणी करण्यासाठी आणले नसल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Post a Comment