अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी कळविले आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कवी , लेखक, कथाकार यांच्या साहित्य कलाकृतीला राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार नुकतेच १ मे २०२५ रोजी जाहीर झाले आहेत.
निवड झालेल्या कलाकृतीचा पुरस्कार प्रदान सोहळा येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२५ रोजी संपन्न होणार आहे . या सोहळ्यासाठी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानने अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य मा.डॉ. माहेश्वरी गावित यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. याबाबत प्रतिष्ठाने पत्राव्दारे लेखी कळविले आहे.
डॉ. माहेश्वरी गावित या आदिवासी साहित्य, लोकसाहित्य, आदिवासी भाषा यांच्या अभ्यासक, समीक्षक आहेत. सन २०१५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या दहाव्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शिबीर, मेळावे यात त्यांनी मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक विचार, व्याख्याने दिली आहेत. त्यांची आदिवासी जीवनावर महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य :एक शोध, आदिवासी साहित्य विचार, आदिवासी विशेषांक, लोक साहित्य : जीवनकला अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.
Post a Comment