संगमनेर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. यानंतर सभासद व जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या अध्यक्षपदी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची एकमताने निवड झाली आहे.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड झाली. अध्यक्षपदी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. आणि उपाध्यक्षपदासाठी पांडुरंग दामोदर घुले यांच्या नावाची सूचना विजय राहणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले. 

यावेळी नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, सतीश वर्पे, डॉ.तुषार दिघे, रामनाथ कुटे,नवनाथ आरगडे, विनोद हासे, गुलाबराव देशमुख, रामदास धुळगंड, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, अंकुश ताजणे, लताताई गायकर, सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कारखाना येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त, काटकसर, पारदर्शकता या आदर्श तत्त्वावर व विचारांवर संगमनेरचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे. सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मध्ये अनेक अडचणी आहेत. खाजगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे.प्रत्येक सीजन हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो. कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात. यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे.

डॉ.तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. महाराष्ट्रातील सहकारातील नेतृत्व म्हणून राज्यातील लोक थोरात साहेब यांच्याकडे पाहत असून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पांडुरंग पाटील घुले म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद शेतकरी यांनी नवीन संचालक मंडळाला बिनविरोध निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे. मागची परंपरा कायम राखत चांगले काम करू असे ते म्हणाले. 

बाबा ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्वांची आदर्श परंपरा आपण जपली असून खूप मोठी संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post