संगमनेर ः राज्यातील नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ता धारक नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास त्यावर दोन टक्के शास्ती कर व अनाधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफ करावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. नवीन लोकप्रतिनिधी हे शास्ती कराबाबतच्या अपूर्ण माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी केली आहे.
नितीन अभंग यांनी दिलेल्या प्रसिद्धी प्रत्येक म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषदेने शहरातील सर्व शास्ती कर माफ करण्यात यावा यासाठी सभागृहात वेळोवेळी ठराव केले आहे. हे ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामावरील शास्ती व दोन टक्के शास्तीकर माफ व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणि वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. याचबरोबर 8 एप्रिल 2025 रोजी या मागणीचे पत्रही शासनाला दिले आहे. या समवेत विधान परिषदेचे आवाज उठवला होता.
नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ताधारक नागरिकांनी दरवर्षी घरपटी न भरल्यास त्यांच्यावर दोन टक्के शास्ती कर आकारण्यात येतो. नव्या आलेल्या शासन निर्णयानुसार दोन टक्के शास्तीकरातील 50 टक्के रक्कम माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच 100 टक्के शास्ती माफ करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव शासनास सादर करावा असे या शासन निर्णयात म्हटलेले आहे.
अनाधिकृत बांधकामातील शास्ती कर हा कोणत्याही प्रमाणात कमी केलेला नाही. तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला आहे. परंतु हा शास्तीचा निर्णय अपूर्ण असून या अपूर्ण माहितीच्या आधारे स्थानिक नवीन लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहे.
संगमनेर नगरपरिषदेने कायम नागरिकांना सर्वोच्च सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र मागील साडेतीन वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासन असून महायुतीच्या प्रभावाखाली हे प्रशासन काम करत आहे. यामुळे शहरातील अनेक मालमत्ता धारकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
संपूर्ण शास्ती कर माफ व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असल्याने शासनाने हा अध्यादेश काढला असून यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आहे .तर उर्वरित निर्णय घेण्यासाठी सुद्धा आमदार सत्यजीत तांबे हे प्रयत्नशील असून संगमनेर मध्ये अपघाताने झालेले लोकप्रतिनिधी हे चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याची टीकाही नितीन अभंग यांनी केली आहे.
संगमनेर शहरांमध्ये विविध वैभवशाली इमारती, गार्डन, रस्ते, याचबरोबर सुरक्षितता आणि बंधूभावाचे वातावरण, संगमनेर शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्यासाठी पाणी, बंदिस्त गटारे, सुरक्षित व सांस्कृतिक वातावरण अशा विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. मोठी बाजारपेठ व आर्थिक उलाढाल असलेल्या संगमनेर शहरातील जनतेचा येथील नेतृत्वावर मोठा विश्वास असून नवीन लोकप्रतिनिधीचे योगदान काय असा सवाल माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी विचारला आहे.
Post a Comment