अहिल्यानगर ः शास्ती माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. याचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे. तसेच नगरपरिषद व नगरपंचायतीचेही उत्पन्न वाढणार असून थकबाकी वसुली होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्थरातून आता स्वागत होत आहे. परंतु हा निर्णयावरून आता राजकीय श्रेयवाद सुरु झाल्याचे चित्र संगमनेर तालुक्यात दिसून येत आहे.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतक्षेत्रातील थकीत मालमत्तावर आकारण्यात आलेल्या शास्तीमुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. ही दीर्घकालीन समस्या दूर करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पाठपुरावा केलेला त्यात त्यांना यश मिळालेले आहे.
राज्यातील नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ता धारक नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास त्यावर दोन टक्के शास्ती कर व अनाधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफ करावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला असून नवीन लोकप्रतिनिधी हे शास्ती कराबाबतच्या अपूर्ण माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी केली आहे.
त्यामुळे शास्ती माफीचा लाभ सर्वसामान्यांना होणे गरजेचे आहे. त्याची अंमलबजावणी होऊन लाभ होण्याच्या अगोदरच हा निर्णय आपल्यामुळेच झाला असल्याचा श्रेयवाद आता संगमनेर तालुक्यात सुरु झालेला आहे. हा श्रेयवाद सर्वांसाठी फायद्याचा नसून तोट्याचा आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक श्रेयवादाची लढाई संगमनेर तालुक्यात सुरु आहे.
जे काम आमदार अमोल खताळ करीत आहे. तेच काम आमदार सत्यजीत तांबेही करीत आहेत. एकाच कामासाठी दोन आमदार प्रयत्न करीत असल्याने त्या कामाचे श्रेय नेमके कोणाला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे ही श्रेय वादाची लढाईल गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
दोन्ही आमदारांकडून शास्ती माफीसाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता दोन्ही आमदारांनी सरकारदरबारी पाठविलेले पत्र समाज माध्यमावर सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे शास्ती माफीसाठी कोणी किती पाठपुरावा केला हे स्पष्ट होईल. त्यासाठी खरे कामदार कोण हेही मतदारांच्या समोर येईल. त्यामुळे श्रेयवाद थांबवून दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी नेत्याकंडून पुरावे घेऊन ते सोशल मीडियावर सादर करावे, अशी अपेक्षा मतदारांमधून होत आहे.
Post a Comment