नगर : एमआयडीसी परिसरात खुनाचा प्रयत्न करून दहशत निर्माण करणारा संतोष धोत्रे व त्याच्या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीवर दरोडा, घातक शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, असे गंभीर स्वरुपाचे २४ गुन्हे दाखल आहेत.
या टोळीवर मकोका कायद्यानुसार कारवाई व्हावी, असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी दिला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींवर लावण्यात आला मकोका या टोळीत संतोष रघुनाथ धोत्रे (वय २७, रा. गुंदेचाहाऊस, नागापूर, अहिल्यानगर), अजय सोमनाथ गुळवे (वय २६, रा. एमआयडीसी, अहिल्यानगर), अमोल गोरख आव्हाड (वय २३, रा. आदर्श कॉलनी, बोल्हेगाव, एमआयडीसी, अहिल्यानगर), अभिषेक नितीन गायकवाड (वय २०, रा. नागापूर, ता. अहिल्यानगर), विशाल भाऊसाहेब पाटोळे (वय २३, रा. गणेश चौक, बोल्हेगाव, ता. अहिल्यानगर), सुधीर प्रदीप दळवी (वय २४, रा.दावल मलिक चौक, नागापूर,ता.अहिल्यानगर), राहुल नाथा गोरे (वय ३५, रा. नागापूर, ता. अहिल्यानगर), शरद जगन पाटोळे (वय २२, रा. नागापूर, ता. अहिल्यानगर), तुषार लहानू पानसरे (वय १९, रा. साईराज नगर, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर), अक्षय बाळासाहेब ठुबे (वय २१, रा. सन फार्माशाळेजवळ, आंबेडकर चौक, एमआयडीसी, अहिल्यानगर), यश सुनील सरोदे (वय १८, रा. नागापूर, ता. अहिल्यानगर), सुरज अरविंद भिंगारदिवे (वय २१, रा. सेन्ट मेरी चर्च समोर, नागापूर, अहिल्यानगर, करण गौतम अवताडे (वय २१, रा.आदर्श कॉलनी, बोल्हेगाव, अहिल्यानगर), आशिष अंतोन पाटोळे (वय २१, रा आंबेडकर चौक, नागापूर, ता. अहिल्यानगर), यश भगवान बुट्टे (वय २१, रा. आंबेडकर चौक, ता. अहिल्यानगर), शेख मोहम्मद ताहीर मुन्ना (वय २१, रा. कसबे वस्ती,सावेडी, अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर धिरज आवारे, आदित्य लक्ष्मण जाचक, प्रतीक नवनाथ तागड यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
Post a Comment