अहिल्यानगर : सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ६ एप्रिल रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गौरव सुनील घाडगे (वय १९, रा. बेलेकर कॉलनी, कर्जत) याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी बारावीत शिकत
असताना २०२४ मध्ये तिची ओळख आरोपीशी झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर पीडित मुलगी क्लाससाठी अहिल्यानगर शहरात आली. आरोपी पीडितेला भेटण्यासाठी आला.
पीडितेने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला. तरीही त्याने पीडितेसोबत फोटो काढले. तु जर माझ्यासोबत बोलली नाही, तर तुझ्यासोबत काढलेले फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन, अशी धमकी आरोपीने दिली.
त्यानंतर तो पीडितेला घेऊन शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला. तिथे त्याने बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडिता नातेवाइकांकडे बीडला असताना तिथेही अत्याचार केला. या पेरकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे लिंग कापून टाकण्यात यावे
ReplyDeletePost a Comment