पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यात खळबळ उडालेली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात तसेच आणखी एक प्रकरण घडलं आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात 31 वर्षीय महिलेने सहा वर्षीय चिमुरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सोसायटीत घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. मयुरी देशमुख असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
मयुरी देखमुखने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे. मयुरी देशमुखने स्वतःच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment