जरे खून प्रकरणातील आरोपीला जामीन...

अहिल्यानगर : नगर पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी हत्या करण्यात आली होती. 


या कामासाठी सागर उत्तम भिंगारदिवे याला सुपारी देण्यात आली होती. भिंगारदिवे याने हे काम आदित्य चोळके याला दिले होते. 

या खून प्रकरणानंतर या प्रकरणाच्या निगडित असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्या शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर घोडके, फिरोज राजू शेख, ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अजय चकली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहेमान अब्दुल आरीफ, जनार्दन अंकुला चंद्रय्या यांचा समावेश आहे. 

या मधील काही जणांचा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर काही जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर उत्तम भिंगारदिवे यास उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथून आज तात्पुरत्या स्वरुपाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

सागर भिंगारदिवे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील अँड. सुनिता सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post