लिंबू उत्पादक आर्थिक अडचणीत

अहिल्यानगर : मे महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे लिंबू उत्पादक आर्थिक अडचणीत आलेले आहे. सध्या लिंबाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. दरववर्षी लिंबाला दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. 


राहाता बाजार समितीत तीन क्विंटल लिंबाची आवक झाली. लिंबाला कमीत कमी दोन हजार व जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लिंबाला सरासरी अडीच हजार रुपयांचा भाव मिळाला. 

दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाची १६.४४ क्विंटल आवक झाली. लिंबाला सर्वाधिक साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लिंबाला कमीत कमी एक हजार व जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला. 

किरकोळ बाजार लिंबाला ३५ ते ३४ रुपये किलोचा भाव मिळत आहे. हाच दर मागील वर्षी १२० ते १४० रुपये किलो होता. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post