मुंबई : गेल्या अडीच वर्षात वीजपुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे पुढील पाच वर्षांत वीज खरेदी खर्चात ६६ हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचा लाभ वीज ग्राहकांना देत पुढील पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी केले आहेत.
नवीकरणीय (रिन्युएबल) ऊर्जेवर भर दिला असून, त्यांचे वीजदर कायम राहणार असल्याने पाच वर्षांनंतर वीजदरात आणखी घट होईल.
विजेची गरज लक्षात घेऊन 2034-35 या वर्षापर्यंत विजेसाठीचे नियोजन केले आहे. पाच वर्षांत राज्याची विजेची क्षमता ४५ हजार मेगावॉटने वाढविण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत.
त्यात प्रामुख्याने सौर, पवन, पंप स्टोरेज, बॅटरी स्टोरेज, यावर भर दिला आहे. त्यामुळे वीज स्वस्त दरांत मिळणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत वीज खरेदीत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचा फायदा घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजदर कपातीच्या स्वरूपात येत आहे.
वीज खरेदीच्या बचतीत सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेचा वाटा आहे. कृषी पंपांसाठी दिवसा वीज देण्यासाठीच्या १६ हजार मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून सरासरी तीन रुपये प्रति युनिट इतक्या कमी दरांत वीज मिळणार आहे. या उपायांमुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे.
Post a Comment