भाजप पदाधिकार्यांकडून रोहित पवार यांच्या प्रतिनिधींना मारहाण...

कर्जत : भाजपाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून आमदार रोहित पवार या भागाचे लोकप्रतिनिधी असून त्यांचे प्रतिनिधी म्हणून ऋषीकेश सावंत, सचिन मोकाशे यांना मारहाण झालेली आहे अशी माहिती प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केली आहे.


कर्जत नगरपंचायतीच्या सभेला पदाधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी महिला नगरसेवकांचे पती आणि एका नगरसेविकेचा भाऊ उपस्थित होता. 

आमदार रोहित पवार या भागाचे लोकप्रतिनिधी असून त्यांचे प्रतिनिधी म्हणून ऋषीकेश सावंत, सचिन मोकाशे हे दोन जनसंपर्क अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अशावेळी त्यांना भाजपाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली.

मंगळवारी या घटनेचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त करीत संबंधित घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी नगरसेवक नामदेव राऊत, डॉ. राजेंद्र पवार, नितीन धांडे, दीपक शहाणे, ऋषीकेश धांडे, सोमनाथ यादव, राहुल नवले, सतीश समुद्र, दीपक यादव, प्रतीक ढेरे, सचिन सोनमाळी, स्वप्नील तनपुरे, रजाक झारेकरी, मनोज गायकवाड, विलास धांडे, ज्ञानदेव लष्कर, विजय नेटके, सचिन मांडगे, संजय भिसे, महादेव खंदारे, रामेश्वर तोरडमल आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post