कर्जतमध्ये रोहित पवार यांच्या जनसंपर्क अधिकार्याला मारहाण...

कर्जत : येथील नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत आमदार रोहित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी आणि समन्वयक उपस्थित असताना त्यांना भाजपाच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केली. 


१६ जून रोजी दुपारी ही घटना घडल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी सांगितले. याबाबत मंगळवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात निवेदन देत दोषींवर कारवाईची मागणी केली.

सोमवारी नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे आणि इतर नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते. यावेळी महिला नगरसेवक यांचे पती तर एका नगरसेविकेचा भाऊ देखील बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते. 

सभेला आमदार पवार यांचे जनसंपर्क अधिकारी आणि समन्वयकही उपस्थित होते. यावेळी हे दोघे सभेला का आले? असा सवाल सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. 

यावेळी दोन्ही बाजूने प्रथम शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर नगराध्यक्षा रोहिणी घुले समर्थकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार पवार यांच्या दोन्ही प्रतिनिधींवर हल्ला करत त्यांना शिवीगाळ केली. यामुळे काही काळ नगरपंचायतीत तणावपूर्ण वातावरण बनले होते.

मंगळवारी या घटनेचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निषेध व्यक्त करीत संबंधित घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी नगरसेवक नामदेव राऊत, डॉ. राजेंद्र पवार, नितीन धांडे, दीपक शहाणे, ऋषीकेश धांडे, सोमनाथ यादव, राहुल नवले, सतीश समुद्र, दीपक यादव, प्रतीक ढेरे, सचिन सोनमाळी, स्वप्नील तनपुरे, रजाक झारेकरी, मनोज गायकवाड, विलास धांडे, ज्ञानदेव लष्कर, विजय नेटके, सचिन मांडगे, संजय भिसे, महादेव खंदारे, रामेश्वर तोरडमल आदी उपस्थित होते.

या घटन्मुळे कर्जत शहरातील राजकीय वातावरण तापले  आहे. मारहाण करणार्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post