संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्या जन्म दिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून जमा झालेल्या शालेय साहित्य व वह्या मतदार संघातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे साडेचार ते पाच हजार गोरगरिबांच्या मुलांना भेट देण्यात आले. शालेय साहित्य व वह्या मिळाल्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब मुलांचे चेहरे चांगलेच खुलेले होते.
शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असताना अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, खोडरबर कंपास पेटी यांसारख्या आत्या आवश्यक वस्तू खरेदी करणे खूप अवघड झाले होते.
अशा ही परिस्थितीत आपल्या मतदारसंघातील एकही विद्यार्थी वह्या व शालेय साहित्य नाही म्हणून कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आमदार अमोल खताळ यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्त हारतुरे पुष्पगुच्छ शाल, केक नको, त्याऐवजी शालेय साहित्य दान करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिक, शिक्षकवर्ग व सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य आणले होते. ते सर्व जमा झालेले शालेय साहित्य मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मार्फत जिल्हा परिषद शाळांमधील गोर गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
विशेष म्हणजे काही शाळांमध्ये साहित्य अपुरे पडू लागले. ही माहिती आमदार अमोल खताळ यांना समजताच त्यांनी माझ्या मतदारसंघातील गोरगरीब विद्यार्थी वह्या पुस्तकाविना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या पगारातून पन्नास हजार रुपये खर्च करत ते उर्वरित शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वितरित केले.
शालेय साहित्यापासून वंचित राहू नये यासाठीचा हा आमदार खताळ यांचा छोटासा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व त्यांच्या डोळ्यांतील चमक अन पालकांचे आभार हेच आमदार खताळ यांच्या कार्याचे खरे यश ठरले आहे. आमदार खताळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment