ढवळपुरी : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढवळपुरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगा आरोग्याची गुरुकिल्ली असे मत प्राचार्य आदम शेख यांनी व्यक्त केले.
योग दिनामित्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्राचार्य आदम शेख यांनी योगा आरोग्याची गुरुकिल्ली आहे. योगाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
२१जून उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. याविषयी माहिती दिली. क्रीडाशिक्षक संजय दळवी व व्यवहारे संतोष यांनी शारीरिक व्यायाम व प्राणायम ,सूर्यनमस्कार आणि योगासने प्रत्यक्षरित्या विद्यार्थी व शिक्षकांकडून करुन घेतले.
यावेळी सहादू भोंडवे, राहुल झावरे,अजित सांगळे, अमोल ठाणगे,राहुल नवले भगवान राऊत , तुकाराम हराळ , अरविंद कुमावत, वर्षा शेळके हर्षा जायभाये, गायत्री पवळवसतीगृह अधिक्षक सुधाकर सुळे ,विश्वनाथ चौधरी, शब्बीर शेख ,राम चौरे,यमाजी झेंडे, फारुख शेख उपस्थित होते.
Post a Comment