श्रीरामपूरमध्ये लूज कांद्यालही चांगला भाव

श्रीरामपूर ः येथील बाजार समितीत सोमवारी कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये गोण्यातील कांदा व लूज कांदा या दोन प्रकारचे लिलाव झाले. यामध्ये गोणीतील कांद्याबरोबरच लूज कांद्यालाही चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


श्रीरामपूर तालुक्यासह वैजापूर, राहाता आदी तालुक्यातून कांद्याच्या २३३०५ गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १६०० ते २०००, दोन नंबर कांदा ः ११०० ते १५५०, तीन नंबर कांदा ः ७०० ते १०५०, गोल्टी कांदा ः १००० ते १५००, खाद ः २०० ते ६५०. मोकळा कांद्याचे लिलाव झाले. 

येथील बाजार समितीत लूज कांद्याच्या लिलावासाठी ८१ वाहनातून कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला ११०० ते १४७५, दोन नंबर कांद्याला ः ८०० ते १०००, तीन नंबर कांद्याला ः ५०० ते ८००, गोल्टी कांद्याला ९०० ते १२००, खाद ः २५० ते ५००रुपयांचा कांद्याला प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post