श्रीरामपूरमध्ये चार लाखाची दारु नष्ट...

श्रीरामपूर ः शहरासह तालुक्यातील हातभट्टी दारू अंड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी  छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये १० गुन्हे दाखल करून ३ लाख ९७ हजार  रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.  


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे  यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये पो नि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ व उमाकांत गावडे अशांना श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंदायाची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले. 

त्यानुसार पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्यात 40 लि. हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 43000,  दुसऱ्या गुन्ह्यात 30 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 36000,  तिसऱ्या  गुन्ह्यामध्ये 40 लि.हातभट्टी दारू व 250 लि.कच्चे रसायन 33000, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या चौथ्या गुन्ह्यांमध्ये 40 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन असा एकूण 38000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाच वागून ना तालुका पोलीस ठाणे दाखल करण्यात आला. यामध्ये 50 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 50000, सहाव्या गुन्ह्यात 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000, सातव्या गुन्ह्यात 35 लि.हातभट्टी दारू व 300 लि.कच्चे रसायन 37000, आठव्या गुन्ह्यांमध्ये 30 लि.हातभट्टी दारू व 350 लि.कच्चे रसायन 41000,  नवव्या गुन्ह्यात 45 लि.हातभट्टी दारू व 200 लि.कच्चे रसायन 29000, तसेच तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या दहाव्या गुन्ह्यात 45 लि.हातभट्टी दारू व 400 लि.कच्चे रसायन 49 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

सदर कारवाई  जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,  अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post