अहिल्यानगर ः जिल्ह्यातील एक शिक्षकांची संस्था अंतर्गत कारभारामुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे. मागील संचालक मंडळाच्या निर्णयांना फाटा देत नवीन नियम लागू केले जात आहे. त्या सभासदांना फटका बसत आहे. सभासदांबाबत सध्या डिव्हीडंचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्या विषयी सभासद असलेल्या एका समाज माध्यमावर टाकलेली पोस्ट अशी आहे...सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी मागील पाच वर्षांमध्ये ..... मंडळाच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्षाप्रमाणे सभासदांना दिलेला डिव्हीडंड पुढील प्रमाणे आहे मागील वर्षी तो नऊ टक्के इतका होता
आर्थिक वर्ष 2018 19 : सभासद 11147. वसूल भाग भांडवल 717653010 रुपये होते. 2018 -19 आर्थिक वर्षात संस्थेला नफा झाला. तो पुढील प्रमाणे बारा कोटी 79 लक्ष 31 हजार 135 रुपये. सर्व सभासद बंधू-भगिनींना सन 2018-19 ला त्या वेळच्या मंडळाच्या संचालक मंडळाने डेव्हिडंट दिला किती होता 14 टक्के लाभांश.
आर्थिक वर्ष 2019-20 : सभासद 11079. वसूल भाग भांडवल 809119232 रुपये होते. 2019-2020 आर्थिक वर्षात संस्थेला नफा झाला. तो बारा कोटी 28 लक्ष 22हजार 112 रुपये आहे. सर्व सभासद बंधू-भगिनींना सन 2019-20 ला पुरोगामी सहकार मंडळाच्या संचालक मंडळाने डेव्हिडंट दिला किती होता 12 टक्के लांभाश दिला होत.
आर्थिक वर्ष 2020-21मध्ये सभासद 11081 होती. वसूल भाग भांडवल होते 797697699 रुपये 2020-21आर्थिक वर्षात संस्थेला नफा झाला आहे. 10 कोटी 16 लक्ष 17 हजार 678 रुपये आहे.
सर्व सभासद बंधू-भगिनींना सन 2020-21 ला पुरोगामी सहकार मंडळाच्या संचालक मंडळाने डेव्हिडंट दिला किती होता 9 लाभांश होता.
आर्थिक वर्ष 2021-22मध्ये सभासद 11151 होते. वसूल भाग भांडवल 100489997 रुपये होते. 2021-22आर्थिक वर्षात संस्थेला नफा झाला तो पुढील प्रमाणे 13 कोटी 29 लक्ष 55हजार 693रुपये होते.
सर्व सभासद बंधू-भगिनींना सन 2021-22 ला पुरोगामी सहकार मंडळाच्या संचालक मंडळाने डेव्हिडंट 10 टक्लाके लाभांश दिला.
2022-23आर्थिक वर्षात संस्थेला नफा झाला तो पुढील प्रमाणे रुपये 12कोटी 85लक्ष 64हजार 686रुपये आहे. सर्व सभासद बंधू-भगिनींना सन 2022-23 ला त्या वेळच्या संचालक मंडळाने 9 टक्के लाभांश वाटप केला.
लाभांश हा त्या आर्थिक वर्षातील संस्थेस झालेल्या नफ्यावर आधारित असतो जर बारा कोटी नफा मिळालेला असताना 14 टक्के डिव्हिडंट मिळू शकतो किंवा दहा कोटी नफा मिळाल्यास नऊ टक्के लाभांश मिळू शकतो हे वरील आर्थिक वर्षातील गणितावरून लक्षात येते तर सण २०२४२५ या आर्थिक वर्षात मिळालेला नफा जो काही असेल त्यावर आधारितच लाभांश मिळायला हवा त्यामुळे हा मागील संचालक मंडळाच्या कारकिर्दीतील लाभांश आहे असे जरी कुणी म्हटले तरी त्यांच्या कालावधीत नेमकी नफा किती मिळाला हे बघणे महत्त्वाचे आहे.
Post a Comment