संग्राम जगताप यांच्यामुळे राष्ट्रवादी अडचणीत... दादांनी बोलवूनही जगताप यांची दांडी...

 अहिल्यानगर ः  आमदार संग्राम जगताप सध्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेत आहेत. याबाबत अजित पवारांनी समज देण्यासाठी जगताप यांना बोलावले होते. मात्र संग्राम जगताप यांनी बैठकीला दांडी मारली.


संग्राम जगताप हे दादांच्या राष्ट्रवादीचे
अहिल्यानगरचे आमदार आहेत. दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी मारली आहे. धर्माबाबत वादग्रस्त विधान करणे पक्षाला परवडणार नाही. संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी आहे.

एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदारांनी पक्षाला परवडणार नाही, असे नेत्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संग्राम जगताप यांच्यासारखी कृती खपवून घेणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी आमदारांच्या बैठकीत दिला आहे. 

आपण स्वतः संग्राम जगताप यांच्याशी बोलणार असून अशा प्रकारची वादग्रस्त विधाने का करत असल्याचा जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, आमदार जगताप यांनी बैठकीला दांडी मारल्याने जगताप यांच्या मनात नेमके काय चालले आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post