संगमनेर ः आजी अन् माजी आमदार तसेच त्यांचे कार्यकर्ते यांचा रोजचा दबाव वाढत चालला आहे. रोजचे काम करून कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकाचे ऐकले तर दुसऱ्याला राग येत आहे. त्यामुळे अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे भिक नको पण कुत्र आवर अशी झालेली आहे.
संगमनेर पंचायत समिती, नगरपालिका, तहसील, कृषी, वन, आरोग्य आदी विभागात अधिकारी अन् कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपर्यंत अधिकारी अन् कर्मचारी आनंदाने कामकाज करीत होते.
येथे कामकाज करीत असलेल्या एकाही अधिकाऱ्याची व कर्मचाऱ्याची कोणाबाबत तक्रार नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अन् सर्वांचेच दिवस फिरले. गुण्यागोविंदाने कामकाज करणाऱ्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचे हाल सुरु झाले.
आज अन् माजी आमदारांपेक्षा त्यांचे समर्थकांकडून विविध प्रकारची कामे संबंधित विभागातून करून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यासाठी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर ते दाबवही टाकत आहेत. दबावातून नियमबाह्यपध्दतीने कामे करण्यास संबंधित भाग पाडत असल्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. नोकरी महत्वाची असल्यामुळे काहीजण असे कामकाज करण्यास नकार देत आहे.
एका गटाचे कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या गटाचे आहात. त्यांनी सांगितल्यावर कामे कसे पटकन करता असे म्हणून अधिकारी अन् कर्मचारी यांना धारेवर धरत आहे. हा प्रकार सध्या वाढत चालला आहे. त्यामुळे अधिकारी अन् कर्मचारी यांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या रोजच्या कटकटीने अनेकांचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्यामुळे काहींनी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तालुकाच बदलून घेण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. पडद्या मागून सुरु असलेल्या हालचालींनी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
संगमनेरातील काहीजणांनी विशिष्टांना हाताशी धरून अधिकाऱ्यांच्या विरोधात झोड उठविण्यास सुरवात केलेली आहे. चांगली कामे होत असतानाही अधिकाऱ्यांच्या विरोधात आता आवाज उठविला जात असल्याने हा प्रकार कोणाच्या तरी सांगण्यावरून होत आहे, हे सर्वसामान्यांच्या चांगलेच लक्षात येत आहे. ते आपली रेश मोठी करण्याच्या नादात दुसऱ्याची रेश पुसत आहे. परंतु त्याने त्यांची रेश मोठी होत नसून ती छोटीच रहात आहे.
समोरच्या रेषेपेक्षा आपली रेष ते मोठी करणे त्यांनी सर्वांना अपेक्षीत आहेत. मात्र त्यांच्याकडून उलटी प्रकार होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी घरकरण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व त्यांच्या प्रकाराचा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व प्रकारांमध्ये अधिकारी अन् कर्मचारी वर्गाची हेळसांड होऊ लागलेली आहे. रोजचा मनस्ताप सहन करण्यापेक्षा आपला दुसरा तालुका बरा असे म्हणून आता प्रत्येकजण आपली सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सुसंस्कृत तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्याची ती ओळख आता पुसली जात आहे. आता संगमनेर तालुक्याची ओळख अधिकारी अन् कर्मचारी यांना काम करण्यास त्रासदायक तालुका म्हणून झाली आहे.
Post a Comment