दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : दीड महिन्यापूर्वी मुलीच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा राग मनात ठेवून त्याचा बदला घेण्यासाठी बापाने एका कॉलेज युवकावर अॅसिड हल्ला केला.
ही खळबळजनक घटना सोमवारी धारगळ-पेडणे गोवा येथे घडली. ऋषभ उमेश शेट्ये (१९) असे युवकाचे नाव असून, तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. पेडणे पोलिसांनी दोडामार्ग तालुक्यातील कळणे डबीवाडी येथील नीलेश गजानन देसाई (४७) याला अटक केली आहे.
ऋषभ म्हापसा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून, सोमवारी सकाळी धारगळ सुकेकुळण येथील बसथांब्यावर तो कॉलेजला जाण्यासाठी थांबला होता. याच दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अॅसिड फेकले आणि पळून गेले. गंभीर जखमी ऋषभला तातडीने बांबोळी गोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Post a Comment