कुकडीतून आवर्तन सुटणार....

अहिल्यानगर : कुकडीच्या  डाव्या व घोडच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरीपासाठी गुरूवारी रात्री पासूनच आवर्तन सोडण्याच्या  जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणार्या आवर्तनाचा लाभ अहील्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राला होईल. सद्य परिस्थितीत धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठयाचा अंदाज घेवून ओव्हर फ्लोचे पाणी लाभ क्षेत्रातील गावांना देण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत बैठक घेतली.त्यानूसार गुरूवारी रात्री पासूनच आवर्तन सोडण्याचे निर्देश त्यांनी दिले.

सद्यपरिस्थितीत लाभक्षेत्रात अपेक्षे इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना धोका होण्याचे गांभिर्य आहे.लाभक्षेत्रातील लोकप्रतिनीधी शेतकरी यांनीही आवर्तन सोडण्याच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आवर्तन सोडण्याच्या निर्णय केला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांतील येणार्या लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना पाणी मिळेल असे काटेकोर नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post