अहिल्यानगर : खासदार निलेश लंके यांनी जलजीवांच्या कामाबाबत या अगोदर अनेक तक्रारी केलेल्या आहेत. या तक्रारींची अद्यापही सखोल चौकशी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
लंके यांच्याकडून तक्रारी होत असताना सत्ताधारी पक्षांनी राजकीय स्टंटबाजी असल्याचाही आरोप अनेकदा केलेला आहे. परंतु आता राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी जल जीवनच्या कामांवर नोंदवला आहे. हिवाळी अधिवेशनात जलजीवांच्या कामावर तक्रारींचा पाऊस आमदारांनी पाडला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून सुमारे 1 हजार 400 कोटी रुपये खर्च करून जलजीवन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे 700 कोटी रुपयांचे बिले अदा करण्यात आलेली असताना प्रत्यक्षात किती गावात जलजीवन योजना कार्यान्वित झाल्या, किती गावे टँकरमुक्त झाली. याचा तालुकानिहाय खुलासा पाणी पुरवठा विभाग करू शकलेला नाही. या योजनेबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाणी पुरवठा मंत्र्यांपर्यंत तक्रारीचा ओघ असतानाही योजना राबवणारे यांची साधी चौकशी झालेली नाही.
या योजनेची दरवर्षी केंद्राच्या पथकाकडून चौकशी झालेली असताना योजनेबाबतच्या तक्रारी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्राच्या चौकशी पथकावरही संशय व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशात देखील जलजीवन योजनेबाबत व पाणी पुरवठा विभागाबाबत तब्बल सहा आमदारांनी प्रश्न संशय उपस्थित केला आहे. यात आमदार राहुल आवाडे यांचा समावेश आहे. कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामाबाबत असणार्या तक्रारीची माहिती त्यांनी मागवली आहे.
आमदार वरूण देसाई यांनी राज्यातील जलजीवन योजनेतील कामांना कशासाठी प्रशासकीय मान्यता दिल्या याबाबत माहिती मागवली आहे. आमदार प्रज्ञा सावंत यांनी अहिल्यानगरसह राज्यात जलजीवन योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही नागरिकांना पाण्याच्यासाठी का पायपिट करावी लागत आहे, याबाबत विचारणा केली आहे.
आहे नगर जिल्ह्यातील दोन सत्ताधारी गटातील आमदारव एक विरोधी पक्षातील आमदार यांनी जल जीवन चा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जल जीवन च्या कामावर विविध भागातून अनेक तक्रारी झालेल्या आहेत.
खासदार लंके यांनी संसदेतही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. खासदार लंके यांच्या तक्रारीनंतर थातूरमातूर चौकशी झाली मात्र त्यातून ठोस असा निर्णय काही आलेला नाही. आता जिल्ह्यातील आमदारांनी ताकरदीचा सूर केलेला आहे.
आमदार रोहित पवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर प्रश्न विचाराल आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना होणारा पाणी पुरवठा हा दुषित असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. आमदार अमोल खताळ यांनी पाणी टंचाईसह ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच यांच्या कामात त्यांच्या पतीचा वाढत्या हस्तक्षेपावर प्रश्न विचारला आहे.
या सर्व आमदारांच्या तक्रारीवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे तत्कारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झालेली आहे त्यांची बदली झाल्यानंतर जल जीवन च्या कामांचा मोठ्या प्रमाणात बोल वाला व्हायला लागलेला आहे. या अगोदर जल जीवन च्या कामावर कोणीही बोलत नव्हते.
Post a Comment