नेवासा : शनी शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी त्यांच्या निवासस्थानी शनी शिंगणापूर परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून शनी शिंगणापूर संस्थान विविध मुद्यांमुळे चर्चेत आहेत. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले होते.
त्यानंतर देवस्थानाचे बनावट अॅप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याचा आरोप देखील झाला होता. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु होती.

Post a Comment