शासन, प्रशासन जर झोपलं असेल, तर जनतेचा जागरूक आवाजच त्यांना जागं करू शकतो!
न स्वच्छता, न नियोजन – ही काय महानगराची ओळख?
घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा उचलणं विसरलं जातंय. ठिकठिकाणी सडलेला, कुजलेला कचरा उघड्यावर पडून दुर्गंधी पसरवतोय. मच्छर, रोगराई आणि आरोग्याचा गंभीर धोका यामुळे नागरिकांचे जिणे मुश्कील झाले आहे.
प्रशासन कुठे आहे? जबाबदारी कुणाची?
“नक्रोडं निसर्ग नाश करिती,
या ढिसाळपणाच्या विरोधात आम्ही – काही सजग नगरिकांनी – “स्वच्छता रक्षक समिती” स्थापन केली. वेळोवेळी महापालिका आयुक्तांना, लोकप्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्युत्तर फक्त एक – सुस्त, निरुत्साही आणि बिनधास्त दुर्लक्ष!
नगरकरांनो, आता जागं व्हा!
उठा ! जागे व्हा ! आणि आपल्या हक्कासाठी संघटित व्हा!
अहिल्यानगर ःएकेकाळी स्वच्छतेचा, सुशोभीकरणाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणारं आपलं नगर आज कचर्याच्या ढिगाऱ्यांखाली दबून तडफडतंय! शहरात जिथं नजर फिरवावी तिथं कचरा, दुर्गंधी आणि घाण साचलेली दिसते. लोकांनी टाकलेला नव्हे, तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रचंड प्रमाणात साचलेला कचरा आज या शहराची नवी ओळख बनत चालली आहे.
घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा उचलणं विसरलं जातंय. ठिकठिकाणी सडलेला, कुजलेला कचरा उघड्यावर पडून दुर्गंधी पसरवतोय. मच्छर, रोगराई आणि आरोग्याचा गंभीर धोका यामुळे नागरिकांचे जिणे मुश्कील झाले आहे.
प्रशासन कुठे आहे? जबाबदारी कुणाची?
कचरा उचलणाऱ्या ठेकेदार संस्थेला म्हणे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत! दुसरीकडे महापालिका आयुक्त सांगतात की ठेकेदाराचे काम असमाधानकारक आहे. कोणाला खरं मानायचं? आणि या आरोप-प्रत्यारोपाच्या चक्रात सामान्य जनता मात्र रोज कचऱ्यात जगते आहे.
“नक्रोडं निसर्ग नाश करिती,
पण माणूस अनास्थेने नगर नाश करितो!”
या ढिसाळपणाच्या विरोधात आम्ही – काही सजग नगरिकांनी – “स्वच्छता रक्षक समिती” स्थापन केली. वेळोवेळी महापालिका आयुक्तांना, लोकप्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्युत्तर फक्त एक – सुस्त, निरुत्साही आणि बिनधास्त दुर्लक्ष!
नगरकरांनो, आता जागं व्हा!
आज अनेक नागरिक त्रासाला कंटाळून शहर सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत. पण हा मार्ग सुटकेचा असला, तरी तो अहिल्यानगरला अंधारात ढकलणारा आहे.हा आपला जन्मभुमीवरचा हक्काचा लढा आहे!
उठा ! जागे व्हा ! आणि आपल्या हक्कासाठी संघटित व्हा!
या लेखाच्या माध्यमातून मी ः सौ. प्रतिभा श्रीगोपाल धूत, स्वच्छता रक्षक समिती सदस्य – सर्व नगरकरांना साद घालते. आपण एकत्र आलो नाही, तर उद्या या शहरात राहणेच अशक्य होईल.
हा प्रश्न केवळ घाणीकडे पाहण्याचा नाही, हा प्रश्न आपल्या भविष्यातील आरोग्याचा, आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा आणि आपल्या शहराच्या प्रतिष्ठेचा आहे!
आमचं पुढचं पाऊल…
आम्ही लवकरच “स्वच्छता संघर्ष समिती” स्थापन करून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडणार आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून, आवाज उठवून, शासनाला आणि प्रशासनाला झोपेतून जागं करणार आहोत.
आज लेख प्रसिद्ध करून आम्ही पहिला आक्रोश व्यक्त करतोय. उद्या या आक्रोशाचा आवाज, एक जनआंदोलन बनेल – यासाठी तुमचा साथ आवश्यक आहे!
“जोपर्यंत झोपलेल्यांना जागं केलं जात नाही,
तोपर्यंत सूर्यही उगवत नाही!”
संपूर्ण नगरकरांना आवाहन:
सक्रिय व्हा, सजग व्हा आणि पुढे या!
सौ. प्रतिभा श्रीगोपाल धूत
श्री. ईश्वर अशोक बोरा
स्वच्छता रक्षक समिती सदस्य
अहिल्यानगरीतील सर्व रोटरी क्लब्स
अहिल्यानगर
स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी अहिल्यानगरसाठी आपण सगळे मिळून या अस्वच्छतेच्या विळख्याचा अंत करूया!
सौ. प्रतिभा श्रीगोपाल धूत
श्री. ईश्वर अशोक बोरा
स्वच्छता रक्षक समिती सदस्य
अहिल्यानगरीतील सर्व रोटरी क्लब्स
अहिल्यानगर

Post a Comment