विरोधकांच्या गोलमोल भूमिकेमुळे सभासदांची निराशा... शिक्षक बँकेची वार्षिक सभा अनपेक्षितपणे शांततेत


अहिल्यानगर : दर वर्षी गोंधळ व गदारोळामुळे चर्चेत असणारी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत झाली. सत्ताधारी गटापेक्षा विरोधकांनी गोलमोल भूमिका घेतल्याने या सभेमध्ये मागील वेळेप्रमाणे फारशी वादावादी झाली नाही. उलट विरोधी गटातील सदस्यांची भाषणे सत्ताधाऱ्यांना पूरक अशी झाल्याने विरोधक मॅनेज झाल्याचा आरोप काही सभासदांनी केला.


सकाळी अकरा वाजता सभेला सुरुवात झाली सभेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांनी प्रास्ताविक भाषणात अहवालातील नमूद बाबींवर प्रकाश टाकला.

जिल्ह्याच्या नावात बदल झाल्याने बँकेच्या नावात बदल करणे बँकेचे कार्यक्षेत्र राज्य भर करणे शेड्युल बँक करणे स्वीकृत संचालकपदी सर्व विभागातून दोन जणांची नियुक्ती करणे शुभमंगल योजनेत एका पत्त्याला लाभ देणे स्टफिंग पॅटर्नमध्ये बदल करणे अशा चार पोट नियमांच्या दुरुस्त्या संचालक मंडळाने सुचविल्या आहेत. त्याला मंजुरी द्यावी असे आवाहन करून त्यांनी एक ते आठ विषय मंजुरीला टाकले.

त्यावेळी विरोधी गटातून प्रवीण ठोंबरे, विकास डावखरे, अविनाश निंभोरे, रघु झावरे आदींनी विरोध करून विषय व न्याय चर्चा घ्यावी असे सांगितले

संजय धामणे यांनी एक एक विषय पुकारून त्यावर चर्चा व्हावी नंतर निर्णय घ्या आधी सर्व विषय मंजुरी कशाला टाकता असा प्रश्न केला. त्यावर सत्ताधारी गुरुमाऊली सदिच्छामंडळाचे अध्यक्ष संतोष घुसंगे यांनी त्यांची समजूत घालून विषयनिहाय चर्चा होईल असे सांगितले .

बारा वाजेपर्यंत सभेत फारशी गर्दी नव्हती. नितीन पंडित यांनी चर्चेला सुरुवात केली. सुनिता हिलाल चव्हाण थोरात यांनी किडनी प्रत्यारोपण या विषयावर उद्भवत्वाकाशी माहिती दिली किडनी दिल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही हे त्यांनी सांगितले.


मिलिंद खंडीजोड यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेतील काही विषयांवर आक्षेप नोंदवत बडतर्फ सभासदांचे थकीत हप्ते कायम ठेवीतून कर्जात वर्ग करा तसेच त्यांच्या मालमत्तेवर कर्ज नोंदवावे अशी मागणी त्यांनी केली. राजू ठोकळ यांनी बँकेच्या कारभाराचे कौतुक करून राज्य कार्यक्षेत्र शेड्युल बँक याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले.

संतोष खामकर, प्रदीप गावडे, मनिषा वाकचौरे, नवनाथ अडसूळ, आबा दळवी, शरद वांढेकर, किरण निंबाळकर, शरद वांढेकर, रघुनाथ झावरे, धनाजी जावळे, कैलास ठाणगे, अशोक निवसे, अर्जुन शिरसाठ, बाळासाहेब सालके, आबा जगताप, राजेद्र जायभाये, संतोष दुसुंगे, विद्युलता आढाव, गोकुळ कळमकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली

प्रवीण ठुबे यांचे आजचे भाषण हे अपेक्षा भंग करणारे होते. मला शेवटी बोलायचे होते पण चालबाजी करून माझे नाव आधी पुकारले असे सांगून दोन वर्षापूर्वी तीन मंडळांचा पराभव करून सत्तेत आले तरी संचालक काय करु शकतात हे आपण पाहिले आहे. संचालक कुणाचेच नाहीत असे सांगून त्यांनी कोण कुणाला पितय हेच कळत नाही राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगून बापू तांबे व माझ्यात वाद विवाद ठेवण्याचे प्रयत्न काहींनी केले असे सांगितले .

ठुबे यांचे आजचे भाषण फारसे टिकात्मक नव्हते. त्यांच्या भाषणावर सत्ताधारी कार्यकर्त्यानी टाळ्या वाजवल्या.

विकास डावखरे यांनी मागील वर्षाच्या कारभारावर टिका केली . उत्पन्न वाढलेले असतांना नफा कमी कसा झाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .

शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी बँकेच्या सर्व प्रश्नांचा उहापोह केला. नोकर भरती करायची असती तर ती यापूर्वीच केली असती असे सांगून आर्थिक सुरक्षितता महत्वाची असल्याने सर्वांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्या असे आवाहन केले .

संजय कळमकर यांचे आजचे भाषण भावनिक होते वार्षिक सभेतील हे माझे शेवटचे आहे . घर चांगले चालले असतांना नको ते पाहुणे घरात घेऊन विस्कोट करून घेऊ नये असे सांगून शेडूल्ड बँक विषय मागे ठेवा असे ते म्हणाले सोन्यासारखी बँक जपा असा सल्ला त्यांनी दिला .

कळमकर यांचे भाषण झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिलासर्व १ते १४ विषय मंजूर करण्यात आले . शेवटी संचालक जेजूरकर यांनी आभार मानले

सभेस बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकिर व्हा चेअरमन योगेश वाघमारे संचालक बाळू सरोदे रमेश गोरे रामेश्वर चोपडे निर्गुणा बांगर संदीप मोटे कैलास सारोकते भाउराव राहिंज महेंद्र भणभणे सूर्यकात काळे शशिकांत जेजूरकर संतोषकुमार राऊत कल्याण लवांडे गोरक्षनाथ विटनोर अण्णासाहेब आभाळे माणिक कदम शिवाजी कराड सरस्वती घुले कारभारी बाबर ज्ञानेश्वर शिरसाठ दिनेश खोसे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत जगताप गणेश पाटील जयसिंग म्हस्के आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post