अहिल्यानगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभेला आज रविवारी सुरवात झालेली आहे. ही सभा सरुवातीपासूनच वादळी होईल, अशी आशा सर्वांना होती. परंतु सभेला सुरवात झाल्यापासून ते एक तास होईपर्यंत सभा शांततेत सुरु होती.
बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकिर, यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुर झाली. या सभेला उपाध्यक्ष श्री.योगेश वाघमारे, संचालक सर्वश्री संदीप मोटे, रामेश्वर चोपडे, बाळू सरोदे, कैलास सारोक्ते, निर्गुणा बांगर, रमेश गोरे, आण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहिज, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, सुर्यकांत काळे, संतोषकुमार राऊत, ज्ञानेश्वर शिरसाठ, शिवाजी कराड, कारभारी बाबर, गोरक्षनाथ विटनोर, महेंद्र भणभणे, कल्याण लवांडे, सरस्वती घुले रविकिरण साळवे विठ्ठल काकडे, सचिन नाबगे, आबासाहेब सूर्यवंशी, सुयोग पवार आदी उपस्थित होते.
या सभेच्या दरम्यान, काहींनी विषय मंजूरचे फलक झळकावले दिसून येत होते. विरोधकांनी अनेक निर्णयाला विरोध करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता पुढेल वेळेत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेला शांततेत सुरवात झाल्यामुळे सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अशीच सभा पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment