राज्यात पावसाने जोर धरला

पुणे ः यंदा मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. 


अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

त्यामुळे ७ ते ९ जुलैदरम्यान राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या काळात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाने ७ ते ९ जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post