तृप्ती देसाईवर कारवाई करा सकल मातंग समाजाची मागणी ः पोलिस अधीक्षकांना निवेदन

अहिल्यानगर ः  भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर त्यांच्यावर तृप्ती देसाई यांनी खोटे आरोप केलेले आहेत. त्याची चौकशी करून देसाई यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. 


यावेळी सकल मातंग समाजाचे अंकुश मोहिते, नामदेवराव चांदणे, पोपटराव पाथरे, पप्पू पाटील, शाहूराजे वडागळे, बाबू पाचारणे, प्रकाश वाघमारे, संतोष शिरसाठ, भगवान मिसाळ, रणजीत वैरागर, दीपक सरोदे, सागर घोरपडे, दीपक साबळे, सुभाष वाघमारे, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.

खोटे षडयंत्र करून नितीन दिनकर यांना बदनाम करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून ते पक्ष बळकट करण्याचे काम करून गोरगरिबांचे कामे करून न्याय मिळवून देत आहेत.

मागासवर्गीय व्यक्ती एवढा मोठ्या पदावर असल्याने काही समाजकंटकांना हे देखवत नाही, असे ही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post