मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या वादावरुन मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. पक्षातील कुणीही परवानगीशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नये, सोशय मीडियावर व्यक्त होऊ नये असे फर्मान राज ठाकरेंनी काढले आहे.
पक्षातील कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये, किंवा व्हिडीओ टाकू नये. प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यायची असा स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात मराठी आणि अमराठी असा वाद सुरू असून त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारांना या सूचना दिल्या आहेत.
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
Post a Comment