शाळा बंद आंदोलनाला शिक्षक भारतीचा पाठिंबा... शासनाच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध

अहिल्यानगर ः अंशतः टप्पा अनुदानित शाळांना पुढील टप्प्यात संपूर्ण अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघ ८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन करत आहे. या आंदोलनाला शिक्षक भारती संघटनेचा ठाम पाठिंबा असल्याची घोषणा शिक्षक भारतीचे  आमदार कपिल पाटील, शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी केली आहे.


शिक्षण क्षेत्राच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या दुटप्पी धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. समृद्धी महामार्गासाठी हजारो कोटींची तरतूद करणाऱ्या शासनाकडे अंशतः अनुदानित शाळांच्या नियमितीकरणासाठी निधी नाही, ही शोकांतिका आहे. 

पावसाळी अधिवेशनात शाळांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये निधीची तरतूद न करणं हे अन्यायकारक आहे. शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनाला शिक्षक भारतीचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे सुनील गाडगे यांनी ठामपणे सांगितले.

गाडगे म्हणाले, राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या हक्कासाठी झगडत आहेत. शासनाने शिक्षण क्षेत्राकडे केवळ खर्चीक खातं म्हणून पाहणं थांबवावं. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांना योग्य सन्मान व आर्थिक सुरक्षाच मिळत नसेल, तर ते दुर्दैवी आहे. शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी शाळा बंद आंदोलनात सक्रिय सहभागी होतील.

या आंदोलनात शिक्षक भारती संघटनेचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या वेळी संघटनेच्या वतीने याप्रसंगी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने  शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे,  जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप,  जिल्हा सचिव विजय कराळे, सोमनाथ बोंतले, जिल्हा महिला अध्यक्ष आशा मगर कार्यवाह संजय भुसारी, कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सचिन शेलार, गोरक्षनाथ गव्हाणे. उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष रामराव काळे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा शिक्षक भरतीचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख,  किसन सोनवने,  संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे,  रेवण घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर, विनाअनुदानितच्या राज्याध्यक्ष रूपाली कुरूमकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारच्या उदासीनतेला तोंड द्यावे आणि शिक्षण हक्कासाठी निर्धाराने उभे राहावे, असे आवाहन शिक्षक भारतीने या निमित्ताने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post