अहिल्यानगर ः कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयात सुरु असलेले आंदोलन संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या ठोस आश्वासनाने मागे घेण्यात आले.
नुकतीच शाळा सुरु होऊन काही दिवस उलटले असताना मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक बदलीचा आदेश आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी पालक संघ समितीच्या माध्यमातून मंगळवार (ता. एक) पासून बुरुडगाव रोड येथील संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरु केले होते.
विद्यार्थी व पालकांनी शाळेवर देखील बहिष्कार टाकल्याने शाळा विद्यार्थ्यांशिवाय भरत होती. सलग तीन दिवस झालेल्या या आंदोलानवर शनिवारी (ता. 5) तोडगा काढून आंदोलन मागे घेण्यात आले.
संस्थेच्या वरिष्ठ पातळीवरुन सदर आंदोलनाची दखल घेऊन यावर सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती पालक संघ समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थी व पालकांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सोमवार पासून नियमीत शाळा भरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment