अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्या वेतन, 7 व्या वित्त आयोगाचा फरक व अन्य रक्कमेपोटी 4 कोटींचा अपहार झालेला आहे.
हा अपहार 2017 पासून 2024 पर्यंत झालेला आहे. या प्रकरणाची चौकशी पारदर्शक न झाल्याचा आरोप आहे. चौकशी समितीतील काहींचे नातेवाईक यातून सुटले असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.
या प्रकरणात 3 मुख्य संशयीत आरोपीसह अन्य 53 जणांच्या खात्यावर अपहारातील कोट्यावधी रुपयांचा निधी वेगवेगळ्या महिन्यांत वर्ग करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने 3 मुख्य दोषींसह ज्या 53 कर्मचार्यांच्या खात्यावर अपहाराची रक्कम गेलेली आहे.
अशा 56 जणांना पुढील 15 दिवसात आधी अपहाराची रक्कम भरण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाची गेल्या मार्च महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या अर्थखात्याकडून चौकशी सुरू होती. ही चौकशी आतापूर्ण झाली असून यात प्राथमिक माहितीत चार कोटी 14 लाखांचा शासकीय पैशांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
Post a Comment