अहिल्यानगर : सासरच्यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या आरोप करत विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पती नितीन रावसाहेब पाखरे (वय ३३), सासरे रावसाहेब पाखरे, सासू भागीत्रा रावसाहेब पाखरे व दीर अशोक रावसाहेब पाखरे (सर्व रा. गणेशनगर रस्ता, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी या पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर येथे राहत आहे. त्यांच्या विवाह ३१ डिसेंबर २०२३ रोजी नितीन पाखरे याच्याशी हिंदू पध्दतीने झाला. मात्र, पती नितीन याने विनाकारण भांडणं, शिवीगाळ व मारहाण सुरू केली.
त्याला मी विरोध केला. तरी ही सासू, सासरे, दिर यांनीही मिळून मला पैशांसाठी त्रास देणे, शिवीगाळ व धमक्या देणे सुरूच ठेवले. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी यांना विनाकारण भांडण करत घराबाहेर काढण्यात आले असे फिर्यादीत म्हटले आहे.
Post a Comment