अहिल्यानगर ः जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणलेले आहेत. विशेष पथक स्थापन करून सध्या कारवाई केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय चालक परागंदा झालेले आहेत.
घार्गे यांनी पदग्रहणाच्या पहिल्याच आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठोस कार्ययोजना आखली होती. त्यांच्या स्पष्ट निर्देशानंतर पोलिस दलाने तातडीने पावले उचलत विविध ठिकाणी छापे टाकले. यामुळे अनेक अवैध धंदे बंद झाले असून गुन्हेगारांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे.
अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, सट्टा आणि इतर बेकायदेशीर उद्योगांवर कडक कारवाई करत पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले असून काहींवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवायांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
वाळूसह सर्वच अवैध धंदे आता बंद झालेले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात माव्याचे मोठे आगार होते. या माव्याचे आगारही आता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पथकाने उध्वस्त केलेले आहे. अजूनही जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या पथकाच्या कारवाया सुरु आहेत. त्यामुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अनेकांनी आपले व्यवसाय बंद करून इतर व्यवसायात पसंत केलेले आहेत. काहीजण शिरुर, सिन्नर, आष्टी, पैठण, कायगाव आदी परिसरात जाऊन आपले धंदे करू लागलेले आहेत. पोलिसांनी दारु, माव्यास जुगारीची अड्डे उध्दस्त केलेले असून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
Post a Comment