आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 


आमदार जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर बुधवार (ता. २) दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेक्स मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

हिंदीतून आमदार जगताप यांना दोन दिवसांत मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिरसाठ यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा टेक्स्ट मेसेज आला होता. 

यात संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा, अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरसाठ यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार अमिना शेख करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post