अहिल्यानगर : तालुक्यातील वांबोरी फाटा ते जेऊर टोल नाका परिसरात ट्रक चालकास कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा संशयित आरोपी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तिघे अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
धीरज आवारे (रा. बोल्हेगाव फाटा, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रकचालकास लुटणारा संशयित आरोपी हा बोल्हेगाव फाटा येथे आहे.
त्याने त्याच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोज मोंढे, पोलिस अंमलदार राकेश खेडकर, राजेंद्र सुद्रिक, सचिन आडबल, शैलेश रोहकले, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, शिवाजी मोरे, सचिन हरदास यांच्या पथकाने केली.
Post a Comment