अहिल्यानगगर ः वेतन त्रुटी दूर करून पदोन्नती स्तर कमी करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक व लेखा संवर्ग कर्मचारी संघटना समन्वय कृती समितीतर्फे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले.
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळातच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक व लेखा संवर्ग कर्मचारी संघटना समन्वय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत जाऊन ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली. त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले.
या वेळी कृती समितीचे मुख्य निमंत्रक बलराज मगर, कृती समिती निमंत्रक संतोष जेजुरकर, अशोक डहाळे, पदाधिकारी पुजारवल, भाऊसाहेब आव्हाड, प्रवीण कुऱ्हे, निशा कदम, समीर आंब्रे, कांबळे, शरद बिरदार. कालीप्रसाद कुऱ्हे,आदी उपस्थित होते.
या सर्वांनी आपली मागणी प्रभावीपणे मांडली आहे. लिपिक यांना न्याय देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. या कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लिपिक यांचा पाठिंबा सदर कृती समितीस प्राप्त झाल्या आहे. लवकरच ग्राम विकास मंत्री यावर निर्णय घेतील, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Post a Comment