राजेंद्र निमसे यांचे निलंबन चुकीचे... सत्यजित तांबे यांच्याकडून शिक्षण विभागाची झाडाझडती

अहिल्यानगर ः  जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक तथा शिक्षक नेते राजेंद्र निमसे यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले, असे आमदार सत्यजित तांबे शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत म्हणाले.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाचा आढाव आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला. शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके,प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपशिक्षणाधिकारी मिना शिवगुंडे कक्ष अधिकारी संभाजी भदगले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या मासिक टूरचा अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला भेटी देऊन तालुकास्तरावरील प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांच्या सोबतीने निकाली काढावेत असे आवाहनही त्यांनी केले.

तांबे म्हणाले राजेंद्र निमसे यांचे चुकीच्या पध्दतीने निलंबन झालेले आहे. याबाबत त्यांनी केलेल्या तक्रारीवर ग्राम विकास मंत्र्यांनी जिल्हा परिषदेकडे तातडीने अहवाल मागवला असता पाच महिने झाले तरी हा अहवाल पाठवण्यात आला नाही. याबाबत जिल्ह्यातील एका आमदाराने पत्र देऊन देखील त्याची जिल्हा परिषदेने दखल घेतली नाही.माझे पत्र असते तर मी आत्तापर्यंत या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असता असा इशारा देऊन सदर अहवाल तातडीने ग्राम विकास मंत्र्यांना पाठवण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.  

या बैठकीनंतर निमसे यांच्या प्रकरणावर उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होती. निमसे यांच्या प्रकरणासंदर्भात आमदार मोनिका राजळे लक्ष घातले होते. त्यांनी याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या पत्रानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग यांना राजेंद्र निमसे यांच्या निलंबनाबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत २४ मार्च २०२५ रोजी निर्देश देण्यात आले होते.

यानुसार ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकारी ज्योत्स्ना अर्जुन यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना ७एप्रिल २०२५ रोजी निर्देश देऊन राजेंद्र निमसे यांच्या निलंबनाबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याविषयी पत्र देण्यात आलेले होते. मात्र जिल्हा परिषदेने पाच महिने होऊनही हा अहवाल ग्रामविकास विभागास सादर झालेला नाही. नेमका हा अहवाल का सादर झाला नाही, याबाबत शिक्षकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे.
-------------
सत्यजित तांबे यांना मंत्री करा... शिक्षक नेते सलीमखान पठाण यांची मागणी

आमदार सत्यजित तांबे हे एक तरुण, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता ठळकपणे दिसून येते. विशेषतः शिक्षण खात्यातील सर्व मुद्द्यांवर त्यांना सखोल माहिती असून त्यांच्या ज्ञानाचा राज्याच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी त्यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष शिक्षक बँक सलीमखान पठाण यांनी केली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत तांबे यांनी जिल्हयातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी अधिकाऱ्यांची झाडझडती घेतली. या वेळी पठाण यांनी ही मागणी केली.  पठाण म्हणाले, "सत्यजित तांबे यांचा प्रत्येक विषयावर दांडगा अभ्यास आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशा सक्षम नेतृत्वाला मंत्रीमंडळात स्थान मिळाले पाहिजे.

राजकारणात तरुण नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, "आजच्या बदलत्या युगात अभ्यासपूर्ण निर्णय घेणाऱ्या आणि नव्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. सत्यजित तांबे ही गरज पूर्ण करणारे नेतृत्व आहे. या मागणीला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post