अहिल्यानगर ः आमदार सत्यजित तांबे हे एक तरुण, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यशैलीत प्रामाणिकपणा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता ठळकपणे दिसून येते. विशेषतः शिक्षण खात्यातील सर्व मुद्द्यांवर त्यांना सखोल माहिती असून त्यांच्या ज्ञानाचा राज्याच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी त्यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी अध्यक्ष शिक्षक बँक सलीमखान पठाण यांनी केली आहे.
पठाण म्हणाले, "सत्यजित तांबे यांचा प्रत्येक विषयावर दांडगा अभ्यास आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अशा सक्षम नेतृत्वाला मंत्रीमंडळात स्थान मिळाले पाहिजे.राजकारणात तरुण नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, "आजच्या बदलत्या युगात अभ्यासपूर्ण निर्णय घेणाऱ्या आणि नव्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे.
सत्यजित तांबे ही गरज पूर्ण करणारे नेतृत्व आहे. या मागणीला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही पाठिंबा दर्शविला आहे. सत्यजित तांबे यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दहा वर्षे कामकाज केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी कामाचा दांडगा अनुभव असून तेच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू शकतात. त्यामुळे त्यांना मंत्री करण्यात यावे, ्अशी मागणी होत आहे.
Post a Comment