संगमनेर _ संगमनेर शहरातील १३० वर्षांची परंपरा असलेला रंगारगल्ली सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज सकाळी सात वाजता सुरू झाला असून पारंपारिक जल्लोषात लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे पूजन झाले. यावेळी झालेल्या मिरवणुकीत आमदार सत्यजित तांबे व डॉ. सौ मैथिलीताई तांबे यांनी ढोल ताशापथकात सहभाग घेऊन ढोलवादन केले
रंगार गल्ली सोमेश्वर मानाचा गणपती येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात मा.आ. डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, प्रतीथयश उद्योजक राजेश मालपाणी डॉ जयश्रीताई थोरात ,डॉ मैथिलीताई तांबे, जयंत पवार ,किशोर पवार, सोमेश्वर दिवटे, सोमेश्वर मंडळाचे अध्यक्ष, रोशन आमले, उपाध्यक्ष अक्षय ढोरे सचिव,अमोल डुकरे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप यांच्यासह सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी , व शहरातील मान्यवर उपस्थित होते.
या मिरवणुकीला पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांचा गजर, मर्दानी खेळ लेझीम पथक यामध्ये सुरुवात झाली. यावेळी ढोल ताशा पथकामध्ये आमदार सत्यजित तांबे व डॉ मैथिलीताई तांबे या दांपत्याने सहभाग घेतला याचबरोबर गणपतीच्या आरती सह विविध गाण्यांवर ढोल वादन केले. लहान मोठा जातीभेद असा कोणताही फरक न मानणारा मानवतेचा पर्यावरण पूरक गणेश उत्सव हा संगमनेर मध्ये लक्षवेधी ठरला.
पारंपारिक ढोल-ताशे, लेझीम, झांजपथक आणि महावादनाचे सूर यामुळे वातावरण दुमदुमले. दिवसभर चालणाऱ्या या मिरवणुकीत मैदानी खेळ आणि पारंपारिक कलाप्रकारांचेही सादरीकरण झाले.
यावेळी आमदार तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक गणपतीची परंपरा सर्व गणेश मंडळांनी जपली आहे सोमेश्वर गणेश मंडळाला 130 वर्षांची परंपरा असून गुलाल व डीजे विरहित मिरवणूक हे आपल्या संगमनेरचे वैशिष्ट्य आहे ढोल ताशा पथक ही पारंपारिक वाद्य असून संगमनेरातील वादकांनी देशभर संगमनेरचा गौरव ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून वाढवला आहे.
या सर्व ढोल ताशा पथकांना एकत्र येऊन आपण शहरांमध्ये महावादन व महा मेळा घेतला संगमनेर करांसाठी ही मोठी आनंदाची पर्वनी ठरली खरे तर डीजे सारखे वाद्य हे आरोग्याला धोकादायक असून पारंपारिक वाद्य आता पुन्हा सर्वांना अधिक प्रिय वाटू लागली आहे या पारंपारिक वाद्यांचा अधिक प्रचार प्रसार व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आय लव संगमनेर चळवळ काम करत असल्याचे ते म्हणाले.
आमदार तांबे यांनी हातात घेतलेला ढोल पाहून उपस्थित सर्वांनी सेल्फी काढत या ढोल वादनाचा आनंद घेतला. यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना दाद दिली.
Post a Comment